स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज हे आजच्या तरुणांचे आयडॉल असतील तर देशाचे भविष्य उज्वल राहील : आनंद काशीद संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : वैराग येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांनी आयोजित केला होता. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रमी तर होतेच त्याबरोबर त्यांनी शिवाजी महाराजांच्या नंतर जे स्वराज्याची अतिशय प्रतिकूल परिस्थिती तयार झाली होती. त्या प्रतिकूल परिस्थितीत आदिलशाही मोबाईल शाही निजामशाही कुतुबशाही या सर्वांच्या विरोधात एकाच वेळी झुंज देत शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य त्याचं तर रक्षण केलेच त्याचबरोबर स्वराज्य विस्तार हा दुप्पट वाढवला यासोबत संभाजी महाराजांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर सात सतक नायिका भेद नकशिक व बुद्धभूषण हे चार ग्रंथ लिहिले अशा अनेक अंगाने आपल्या बुद्धीच्या तुर्याच्या जोरावर संभाजी महाराजांनी युद्ध सोबत अनेक पराक्रम त्यांच्या आयुष्यात त्यांनी केले आहेत.

या सर्वांचा अभ्यास आजच्या तरुणांनी कर्ण गरजेचा आहे. तो त्यांनी केला तर आजचा तरुण देशाला उज्वल भविष्य देऊ शकतो त्यामुळे आजच्या तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांना त्यांचे आयडॉल बनवायला हवे असे प्रतिपादन यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आनंद काशीद यांनी केले.

यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, सामाजिक कार्यकर्ते राजे निंबाळकर , मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष धनंजय गरड, विक्रम बापू घायतिडक, अभिजीत मोरे, विकास गरड यांच्यासह मोठ्या संख्येने शंभू प्रेमी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कमलाकर ताटे, महेश खेंदाड आदींनी परिश्रम घेतले.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या