ज‍िल्हा पर‍िषद व पंचायत सम‍िती सार्वत्रिक न‍िवडणूक काळात ज‍िल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सोलापूर, दि. 16 : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक- २०२६ ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हयात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत सोलापूर ज‍िल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ लागू करण्यात येत असल्याचे ज‍िल्हाध‍िकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रस‍िध्दी पत्रकान्वये कळव‍िले आहे.

या आदेशान्वये खालीलप्रमाणे न‍िर्बंध घालण्यात आले आहेत –

ज‍िल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचाराचे साहित्य सार्वजनिक इमारती ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर निवडणूकी संबंधी पोर्टस, बॅनर्स, पॉम्प्लेटस, कटआऊटस, होर्डींग्ज, कमानी इत्यादी रहदारीस अडथळा निर्माण होईल व अपघात होईल अशा पध्दतीने
लावण्यावर.

जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तालुका दंडाधिकारी कार्यालये आणि सर्व शासकीय/निमशासकी कार्यालय व विश्रामगृह या ठिकाणी पुढील बाबी करण्यास या आदेशान्वये बंदी घालण्यात येत आहे.

कोणत्याही प्रकारची मिरवणूक, सभा घेणे, मोर्चा काढणे, उपोषण करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे , वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे इत्यादी. कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे.

कोणतीही व्यक्ती, संस्था पक्ष कार्यकर्ते यांनी ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पीकरचा) वापर पोलीस अधिकाऱ्याचे परवानगी शिवाय करता येणार नाही. सकाळी ०६.०० वाजण्यापूर्वी आणि रात्री १०.०० वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात. ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. प्रचाराकरीता ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबुनच करावा, फिरणाऱ्या वाहनास रस्त्यावरुन धावत असतांना ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार व इतर व्यक्तींनी निश्चीत ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरासंबंधीच्या परवानगीची माहीती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक
राहील.

कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांचे प्रतिनिधींनी किंवा त्यांचे हितचिंतकांनी निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे इत्यादीकरीता कोणत्याही व्यक्तींच्या खाजगी जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादींवर संबंधीत मालकीच्या परवानगी शिवाय व संबंधीत सार्वजनिक प्राधिकरणाची परवानगी शिवाय वापर करण्यावर निर्बंध घालीत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती भागात शासकीय /निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात सक्षम प्राधिकाऱ्याचे पूर्वपरवानगी शिवाय होर्डींग्स, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिरात प्रदर्शीत करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालीत आहे.

जिल्हयात कोणत्याही राजकीय पक्षांना निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहा पेक्षा अधिक मोटार गाडया/ वाहनांचा ताफ्याचा वापर करण्यास निर्बंध घालीत आहे.

निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारचे जात/भाषा/धर्मावर शिबिरांचे आयोजन करण्यावर निर्बंध घालीत आहे.

जिल्हयात कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार रॅलीमध्ये १० पेक्षा अधिक मोटार गाड्या / वाहने असू नये तथापि १० गाड्यांच्या दोन ताफ्यामध्ये १०० मीटरचे अंतर असावे.

सोलापूर जिल्हयाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटार गाड्या यांचा समावेश नसावा. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे परिसरात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस मिरवणूक, सभा घेणे, घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस निर्बंध घालीत आहे.

राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना खालील बाबीवर निर्बंध घालीत आहे. इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमुन देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे इत्यादी.

जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालीत आहे.

सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे, इत्यादी बाबत मा. राज्य निवडणूक आयोगाकडून दिलेले सूचने नुसार खालीलप्रमाणे निर्बंध घालीत आहे.

सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही वाहनावर कोणताही ध्वज किंवा बॅनर किंवा मोठ्या आकाराचे स्टिकर लावू नयेत. फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंड स्क्रिन ग्लासच्यापुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या पासून २ फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसना मागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही.

फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे न‍िवडणूक प्रत‍िन‍िधींनी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इत्तर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही.

जिल्हयातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरत्या स्वरुपात पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध घालीत आहे. हा आदेश सोलापूर जिल्ह्यासाठी निर्गमीत झाल्याच्या तारखे (13 जानेवारी 2026) पासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण हाईपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता-२०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असे पत्रकात नमूद आहे.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या