भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम बहुउद्देशीय सभागृहाचे लोकार्पण आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी शहरातील परंडा रोड येथील महेदवी नगर जवळील ५३ लाख, १२ लाख, ६४३ रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बहुउद्देशीय सभागृहाचे लोकार्पण आमदार राजाभाऊ राऊत व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष ॲड आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, इन्नुस महेदवी साहेब, अबू तालीब शेख, रज्जाक बाबुडे, सलीम पठाण, महंमद मोमीन, फिरोज चाबरू, इन्नुस (शशी) शेख, इरफान शेख, मुन्ना मोमीन, कॉम्रेड अय्युब शेख, आदमभाई, एल.बी.शेख, बाळासाहेब गव्हाणे, नगरसेवक कय्युम पटेल, दिपक राऊत, इमरान मुल्ला, नागजी दुधाळ, भैय्या बारंगुळे, मदन गव्हाणे, विजय चव्हाण, रोहित लाकाळ, लिंबुवाली सवारी ग्रुप, ७०७ झोपडपट्टी ग्रुप, उडान फाऊंडेशनचे सदस्य व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.