खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या मोहोळ तालुक्यातील पीर टाकळी येथे २ कोटी ५० लाख रुपयांच्या ३३/११ KV विद्युत उप केंद्र कामाचा शुभारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क
मोहोळ : तालुक्यातील पीर टाकळी व आसपासच्या गावांमध्ये कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या भागातील बहुतांश क्षेत्र ओलिताखाली असल्याने विद्युत उप केंद्र होणे गरजेचे होते.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्यात ग्रामस्थांनी 33/११ K V विद्युत केंद्र व्हावे अशी मागणी केली होती. खासदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडे सातत्याने पाठपुरावा करून 33/११ K V विद्युत उप केंद्राची मंजुरी मिळविली आणि या २ कोटी ५० लाख रुपयांच्या विद्युत उप केंद्राच्या कामाचा भूमिपूजन समारंभ खासदार शिंदे यांच्या हस्ते मान्यवर नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी प्रणिती शिंदे यांनी या विद्युत उपकेंद्रामुळे पीर टाकळी, कामती जिल्हा परिषद गट आणि इतर गावांतील शेतकऱ्यांची विजेची समस्या कमी होऊन शेतीसाठी पाणी, उद्योगासाठी वीज मिळण्यासाठी सोयीचे होणार आहे.
यावेळी मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, पीर टाकळी सरपंच अनिकेत पाटील, महेश धुमाळ, अशोक भोसले, सुनील पवार, महावितरण चे अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.