पहिल्याच दिवशी महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी घेतला महापालिकेत आढावा बैठक….

महापालिकेच्या विविध विभागाची घेतली माहिती…
B1न्यूज मराठी नेटवर्क
पाणी पुरवठा,ड्रेनेज,स्वछता,रस्ते,आरोग्य व शिक्षण अश्या विषयास प्राधान्य दया.- नूतन आयुक्त डॉ. सचिन ओंबासे
सोलापूर : महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी आज मिटींग हॉल येथे सर्व विभागातील अधिकारी यांची बैठक घेऊन महापालिकेचा कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी महापालिकेतील व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विविध प्रकल्प तसेच उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईन चा सध्या स्थितीचा कामाचा आढावा, अमृत योजना, मला शुद्धीकरण प्रक्रिया, केंद्र शासन पुरस्कृत N CAP च्या माध्यमातून झालेले कामाचा आढावा,रमाई आवास योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरि वस्ती सुधारणा योजना,शहरतील पाणी पुरवठा,लाईट विभाग, रस्ते, ड्रेनेज,घनकचरा विभाग,आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, अमृत योजना,उद्यान विभाग,पर्यावरण विभागा संदर्भातील माहिती तसेच सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटी च्या माध्यमातून कमांड अँड कन्ट्रोल सेंटर उभारणी करण्यात आली असून त्यामध्ये शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करणेकामी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या नियंत्रण कक्ष, स्काडा प्रणाली, घंटागाडी रूट मॅप, शहरातील सीसीटीव्ही, सुरक्षा यंत्रणा, पाणीपुरवठा वितरणाचे कामकाजची सुरु आहे.
शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसविणेत आलेल्या सीसीटीव्ही, एलईडी दिवे, कचरा संकलन केंद्राच्या गाड्या, पाणीपुरवठा वितरण प्रणाली व स्काड प्रणाली, ड्रेनेज बाबत तक्रारी,अग्निशमन विभाग,आपत्ती व्यवस्थापन आदी संदर्भात माहिती घेतली.
या बैठकिस अतिरिक्त आयुक्त रवि पवार,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमुर मुलाणी,मुख्य लेखापरीक्षक रूपाली कोळी, मुख्यलेखापाल रत्नराज जवळगेकर, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, विद्युत कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, नगर सचिव प्रवीण दंतकाळे, संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर, आरोग्य अधिकारी राखी माने, अग्निशमन विभाग प्रमुख राकेश साळूंखे, किशोर सातपुते,उपअभियंता नीलकंठ मठपती, प्रकाश दिवाणजी, रामचंद्र पेंटर, तपण डंके, उद्यान अधिकारी किरण जगदाळे, कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे पशुवैधकीय अधिकारी सतीश चौगुले, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, विधना सल्लागार संध्या भाकरे सह सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नूतन आयुक्त डॉ.सचिन ओंबासे यांनी सर्व अधिकारी यांना पाणी पुरवठा,स्वछता,रस्ते, आरोग्य व शिक्षण अश्या विषयास प्रधन्या दया व आप आपल्या विभागाची चांगल्या पद्धतीने कामकाज करण्याचा सूचना दिल्या.