बार्शी येथे झाडांच्या पुस्तक ग्रंथालयाचा शुभारंभ , वृक्ष संवर्धन समिती बार्शीचा अनोखा उपक्रम

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : वृक्ष संवर्धन समिती मार्फत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती चे औचित्य साधून बार्शी येथे झाडांच्या पुस्तकांचे ग्रंथालय चा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वन अधिकारी मनोज बारबोले,मधुकर डोईफोडे, लेखक मदन देगावकर, पत्रकार प्रशांत काळे, संजय बारबोले,दिनेश मेटकरी, प्रा.शशिकांत धोत्रे हे उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी ग्रंथालय स्थापन करण्या पाठीमागची भूमिका वृक्ष संवर्धन समितीचे प्रमुख सदस्य राहुल तावरे यांनी आपल्या प्रास्ताविकामधून सविस्तर मांडली.यावेळी ते म्हणाले वृक्ष संवर्धन समिती बार्शी वृक्ष लागवडी बरोबर त्याच्या संवर्धनाचे ही काम करते. हे करत असताना पर्यावरण व झाडांची सखोल माहिती जनसामान्यांना व्हावी म्हणून या झाडांच्या पुस्तकांचे ग्रंथालय आम्ही सुरू केले आहे. मनोज बारबोले यांनीही या ग्रंथालयास जमेल एवढी मदत करेल असा शब्द दिला.यावेळी मधुकर डोईफोडे आणि वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या ग्रंथालयामध्ये पर्यावरणातील सर्व घटक वनस्पती, वेली, झाडे, झुडपे, प्राणी, पक्षी, कृषी, रानभाज्या, झाडांचे औषधी उपयोग, जल, जमीन व पर्यावरण यासंदर्भात माहिती उपलब्ध असलेली पुस्तके वाचकांना मोफत वाचण्यासाठी उपलब्ध होतील.यामुळे गैरसमजा मधून अनेक झाडांची नागरिकांकडून कत्तल होते, तसेच पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा घटना घडतात याबाबत शस्त्रोक्त पद्धतीने पुस्तकांच्या माध्यमातून नागरिकांना माहिती होईल व होणारी हानी टाळता येईल, पर्यावरणातील सर्व घटकांची नव्या पिढीला चांगली ओळख होईल या उद्देशाने हे ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.सचिन चव्हाण यांनी केले तर आभार वृक्ष संवर्धन समितीचे कार्याध्यक्ष संदीप पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वृक्ष संवर्धन समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या