वृक्ष संवर्धन समिती बार्शी तर्फे सुंदर माझी बाग स्पर्धेचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शिवजयंतीचे औचित्य साधून बार्शी येथील वृक्ष संवर्धन समितीने सुंदर माझी बाग या गच्चीवरील बाग तसेच परसबाग स्पर्धेचे आयोजन केले आहे.अशी आगळीवेगळी स्पर्धा भरवण्याचं हे चौथे वर्ष आहे.
गेल्या साडेपाच वर्षापासून वृक्ष संवर्धन समिती बार्शी शहरात व तालुक्यात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करते आहे याअंतर्गत…..हरित घर हा उपक्रम देखील समितीने घेतलेला आहे. त्यालाच अनुसरून घरामध्ये फुलझाडे, फळझाडे, शोभिवंत झाडे असावीत, घरात लागणारा केमिकल विरहित भाजीपाला घरातच तयार करावा, बागकामाची हौस असावी, स्वयंपाक घरात निर्माण होणारा कचरा खत म्हणून घरातच वापरण्यात यावा, घरात बाग फुलविणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, बागकाम माहितीची देवाणघेवाण व्हावी याकरिता या स्पर्धेचे आयोजन वृक्ष संवर्धन समिती तर्फे गेल्या चार वर्षापासून केले जाते असे वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी सांगितले. यावर्षी ही स्पर्धा दोन गटात घेतली जाईल.
पहिला गट गच्चीवरील/अंगणातील फळबाग भाजीपाला बाग स्पर्धा. तर दुसरा गट गच्ची वरील/अंगणातील शोभेच्या झाड बाग स्पर्धा अशा स्वरूपाचा असेल. ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने होईल. ज्यांना नाव नोंदणी किंवा स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे त्यांनी राहुल तावरे (8862075605), संदीप पवार (7385983300), राणा देशमुख (9921641856) उदय पोतदार (9028358093) या व्हाट्सअप नंबर वर आपले नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सह आपल्या बागेचा माहितीयुक्त तीन मिनिटाचा व्हिडिओ पाठवायचा आहे. स्पर्धेत नाव नोंदणीची अंतिम मुदत १८ फेब्रुवारी आहे. सहभागासाठी नाव नोंदणी मोफत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक यामध्ये सहभागी होऊ शकतात.