बार्शीतील सुयश विद्यालयाला सन 1966 कलम 53 नुसार बार्शी नगर पालिकेची कायदेशीर नोटीस

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : कुर्डूवाडी रोड येथील असलेले सुरेश विद्यालय गट नंबर 799 याचे संस्थापक शिवदास तात्या नलावडे व श्रीमती माधुरी शामसुंदर गवळी यांना बार्शी नगरपालिके कडून कायदेशीर नोटीस.
मिळालेल्या माहितीनुसार सुयश विद्यालय या विनाअनुदानित, स्वयंअर्थशास्तित खाजगी तत्वावर मान्यता मिळालेल्या शाळेच्या व्यवस्थापनाकडून शाळेच्या इमारतीसाठी बांधकाम करण्यात आलेले आहे.

सदर शाळेचे एकूण तीन इमारती अस्तित्वात आहेत. शाळेच्या इमारतींच्या बांधकाम परवान्यासाठी बार्शी नगरपालिकेकडे वेगळ्याच कागदपत्रे सादर करून प्रत्यक्षात अनेक पटीने तफावत असलेले नियमबाह्य व बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलेले आहे .
सदर शाळेच्या व्यवस्थापनाने शाळेचे इमारतीच्या बांधकामाकामी बार्शी नगरपालिकेकडून घेतलेल्या बांधकाम परवाना मध्ये सदर इमारतीचा वापर निवासी व औद्योगिक कारणासाठी असे प्रयोजन दाखविले आहे. परंतु सदर बांधकामाचा पूर्णपणे शैक्षणिक व्यावसायिक कारणाकरता वापर विनापरवाना होत आहे सदर संस्थेने संस्थापक मंडळी व सहकार्याने शाळेच्या इमारतीच्या बांधकामाचे पूर्णत्व प्रमाणपत्र न घेता वापर परवाना न घेता सदर इमारतीचे बेकायदेशीरपणे वापर करणे चालू ठेवले असल्याचेही दिसते आहे.

वरील प्रकरणाचा बार्शी नगरपरिषद मुख्याधिकारी, नगर रचनाकार यांनी चौकशी करून पाहणी करून, पर्यवेक्षण करून, वरील कृत्यावर आक्षेप घेऊन मालमत्ता धारक, संस्थाचालक यांना महाराष्ट्र राज्य नगर रचना अधिनियम इसवी सन 1966 कलम 53 नुसार कायदेशीर नोटीस दिली आहे.

संस्थाचालकांना बजावण्यात आलेल्या तिन्ही इमारतीच्या बेकायदेशीर नोटीस मध्ये 30 दिवसाच्या आत बेकायदेशीर बांधकाम स्वतः काढून घ्यावे ,अन्यथा महाराष्ट्राचे नगररचना अधिनियम 54 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल असे सुचित करण्यात आले आहे.

सदर नोटीस बार्शी नगरपालिकेचे विद्यमान प्रशासक श्री बाळासाहेब चव्हाण यांच्या आदेशाने व नगर रचनाकार श्री देवानंद जाधव यांच्या परिवेक्षणाखाली लागू झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार शैक्षणिक संस्थांचे नियमाची पायमल्ली होत असताना दिसते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या