मुंबई विद्यापीठाला १३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य पदकासह सलग सहाव्या वर्षी विजेतेपद

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे नुकत्याच पार पडलेल्या १७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाला १३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य पदकासह सलग सहाव्या वर्षी विजेतेपद मिळाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी संशोधन, नाविन्यता आणि कल्पकतेच्या जोरावर आविष्कार सारख्या संशोधन स्पर्धेतील यशाने मुंबई विद्यापीठाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. या संशोधनाद्वारे समाजजीवन सुसह्य व आनंददायी होण्यासही मदत होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, डॉ. सुनिल पाटील,डॉ. मनीष देशमुख ,डॉ. वैशाली निरमळकर, प्रा. डॉ. शशिकुमार मेनन, प्रा. डॉ. सुनीता शैलजन, डॉ. मिनाक्षी गुरव, डॉ. भूषण लांगी, डॉ. रूपा राव मुंबई विद्यापीठाचे अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.