आंदोलनमहाराष्ट्रमुंबई

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करा…. ॲड विकास जाधव

निपक्षपातीपणे तपास होण्यासाठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : मस्साजोग ता. केज जि.बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे असलेल्या सूत्रदारांना तात्काळ अटक करावी अशा मागण्यांसाठी सरपंच परिषदेकडून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन केले.

यावेळी राज्यातील सरपंच परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या केली त्यांच्या मारेकऱ्यांनी अतिशय क्रूर कृत्य केले तरीही त्यांच्या मारेकऱ्यांना पोलीस प्रशासन पाठीशी घालत आहे . यातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड यांना आरोपी केलेले नाही तसेच या सर्व घटनेचे धागेदोरे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे जात असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे त्यामुळे मी पक्षपातीपणे तपास होणे अशक्य आहे. तपास अधिकारीही संशयाच्या भौवर्यात आहे अशा परिस्थितीत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल की नाही अशी शंका सर्वसामान्य लोकांच्या मनात निर्माण होत आहे. त्यामुळे सरपंच परिषदेच्या वतीने मुंबईत आझाद मैदानावर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन या आंदोलनात प्रसंगी मुख्य सूत्रधारांना आरोपी करा धनंजय मुंडे यांचा राजीनामा व आरोपींना तात्काळ असू द्या अशी मागणी त्यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड विकास जाधव यांनी केली आहे. दरम्यान सरपंच परिषदेच्या या आंदोलनात आष्टी पाटोदा मतदार संघाचे आमदार सुरेश धस विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सहभाग नोंदवून आंदोलनास पाठिंबा दिला.

यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे उपाध्यक्ष ॲड विकास जाधव राजीव पोतनीस आनंद जाधव शिवाजी मोरे किसन जाधव सुषमा देसले कल्याणी पाटील आदिनाथ देशमुख कविता घोडके-पाटील , शिवानंद बंडे विकास साळुंखे- पंडित मिरगणे विकास माने,,संदीप बोटे,अमोल दुरांदे यांचे सह राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button