सोलापूर महापालिकेच्या वतीने प्रथमच पोषण पुनर्वसन केंद्राची स्थापना

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : महानगपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या हस्ते सोलापूर महानगपालिकेच्या पोषण पुनर्वसन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. सदर उदघाटनप्रसंगी आयुक्त शीतल तेली – उगले यांनी पोषण पुनर्वसन केंद्रावर दाखल कुपोषित बालक व त्यांच्या माता यांच्याशी संवाद साधून बाळाच्या काळजी बाबत मार्ग दर्शन केले.

21व्या शतकात असूनही बालकांमध्ये कुपोषण ही अतिशय गंभीर समस्या आहे. एकूण होणाऱ्या बालमृत्यूंमध्ये सुमारे 33% बालके कुपोषित असतात. ही समस्या ग्रामीण भागामध्ये जरी असली तरी शहरी भागामध्ये सुद्धा याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आलेले आहे ,या अनुषंगाने सोलापूर शहरांमधील सर्व ० ते ५ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून यामध्ये 41 अति कुपोषित आणि 604 कुपोषित बालके आढळलेली आहेत. सोलापूर शहरातील कुपोषित बालकांची संख्या लक्षता घेता सदर कुपोषित बालकांचा पुन्हा आरोग्य बनविण्यासाठी महानगरपालिकेने पोषण पुनर्वसन केंद्र डफरीन चौक येथे प्रारंभ केले आहे.यामध्ये शून्य ते पाच वयोगटातील बालकांना दाखल केले जात आहे.

बालकांच्या दृष्टीने अतिशय सुंदर असे वातावरण येथे निर्माण केलेले आहे.त्यांना 14 दिवस मोफत सकस आहार ,स्वच्छता, घरच्या घरी उपलब्ध पदार्थातून पोषण आहार बनवण्याचे प्रशिक्षण तसेच आवश्यकतेनुसार औषधोपचार देण्यात येत आहे. बालकांच्या मातांना निवासी भत्ता येणार आहे.आज पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये 14 बालके दाखल झालेली आहेत. व त्यांच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी सर्व सोयीनुयुक्त असे स्टाप व त्या ठिकाणी लहान पोषक अहार त्याबरोबर मुलांनासाठी खेळणी, टीव्ही इत्यादी सोय करणायत आले आहे.महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने तसेच प्रजनन व बाल आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरशेट्टी आणि त्यांचे सहकारी यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी बालरोगतज्ञ डॉ. कोरे, डॉ. चाफळकर, डॉ. वाळवेकर, डॉ. आतिश बोराडे तसेच शहरांमधील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका ,नागरी आरोग्य केंद्रा कडील वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ तसेच आशाताई उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या