श्री भगवंत सुपर स्पेशालिटी हाँस्पीटल बार्शी येथे नर्सिंग GNM काँलेजची स्थापना
विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण उपलब्ध करून देणारा – डॉ अमित पडवळ, न्यूरोसर्जन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : श्री भगवंत सुपर स्पेशालिटी हाँस्पीटल बार्शी येथे नर्सिंग GNM काँलेज ची स्थापना सह्याद्री नर्सिंग काँलेज च्या जीएनएम बॅचचे स्वागत समारंभ संपन्न. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नर्सिंग क्षेत्राच्या संस्थापिका प्लाँरेन्स नाइटिंगेल व श्री भगवंतच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान नवीन प्रवेशित विद्यार्थ्याना त्यांच्या वैद्यकीय प्रवासाची सुरुवात म्हणून विभागप्रमुख, प्राध्यापक सदस्य, प्रशासन आणि डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची ओळख करून दिली. पुष्पगुच्छ देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे नियम व कायदे, शैक्षणिक वेळापत्रक आणि उपलब्ध विविध सुविधांची माहिती देण्यात आली.
आपल्या भाषणात श्री भगवंत सुपरस्पेशालिटी हाँस्पीटल चे सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. अमित पडवळ यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. सुमित पडवळ यांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे स्वागत केले आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण, क्लिनिकल एक्सपोजर, संशोधन संधी आणि विद्यार्थी सहाय्य सेवांच्या वचनबद्धतेवर भर देण्यास सांगितले.
बालरोग तज्ज्ञ डॉ. दिग्गज दापके-देशमुख यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करण्याचा, गंभीर विचार विकसित करण्याचा आणि प्राध्यापक आणि मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, न्युरोसर्जन डॉ.अमित पडवळ, डॉ सुमित पडवळ,यांच्यासह संचालक दादासाहेब कोरके, पांडुरंग घोलप, ज्ञानेश्वर गिरी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.