बार्शीच्या महावीर कदम यांची ऑस्ट्रेलियामध्ये फुल आयर्न मॅन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महावीर कदम यांनी ऑस्ट्रेलियामध्ये फुल आयर्न मॅन स्पर्धेत केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्यांनी बार्शी आणि भारताचा अभिमान वाढवला आहे. 226 किमीच्या या कठीण आव्हानाला यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास त्यांनी दाखवला आहे.
4 किमी पोहणे, 180 किमी सायकलिंग आणि 42 किमी धावणे या आव्हानांचा सामना करत त्यांनी 13 तास 41 मिनिटांत ही कामगिरी पूर्ण केली. 3400 स्पर्धकांच्या उपस्थितीत कठीण हवामान आणि मार्गावर मात करून त्यांनी मिळवलेला हा विजय उल्लेखनीय आहे.
महावीर कदम यांची ही कामगिरी केवळ बार्शीसाठी नव्हे तर भारतासाठीही प्रेरणादायी आहे. त्यांच्या यशाबद्दल बार्शीत जल्लोषाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या जिद्दीमुळे आणि मेहनतीमुळे भविष्यात अधिक उंच शिखरे गाठण्याची प्रेरणा अनेकांना मिळेल. महावीर कदम यांचे मन:पूर्वक अभिनंदन!