अशोक नागटिळक महाराज यांचा भगवंत ब्लड बँकेकडून सन्मान
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे (रातंजन) संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक महाराज यांचा भगवंत ब्लड बँकेकडून प्रमाणपत्र , ट्रॉपी, शाल देऊन जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अशोक नागटिळक महाराज यांनी रक्तदान शिबीर आयोजित करुन / शिबीर आयोजनात मोलाचे सहकार्य करुन, रक्तदात्यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले व रक्तदानाची चळवळ अखंडपणे चालू ठेवण्यास सहकार्य केले. या समाजोपयोगी कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी भगवंत ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे, महामानव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी , मानवता संस्थेचे सचिव बापू नागटिळक , उपाध्यक्ष गौतम नागटिळक, टेक्निशियन प्रसाद जगदाळे , स्वप्नील भालशंकर, निलेश गिराम, बँकेचे कर्मचारी , संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.