कॉम्रेड शाहीर अमर शेख जयंतीनिमित्ताने कम्युनिस्ट पक्षाचे झाले व्याख्यान

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : 20 ऑक्टोबर 2024 वार रविवार रोजी आयटक कामगार केंद्र बार्शी येथे कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या जयंती निमित्ताने भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार केंद्र यांच्या संयुक्त वतीने कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांचे व्याख्यान घेण्यात आले. यावेळी कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून कॉम्रेड ए.बी. कुलकर्णी, कॉम्रेड लहू आगलावे व टीडीएफ चे जिल्हाध्यक्ष सचिन झाडबुके हे उपस्थित होते.

यावेळी कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, “अमर शेख यांची आई मुनेरबी या मुस्लिम असूनही त्यांनी वारकरी संप्रदायावर ओव्या रचिल्या, हिंदू मुस्लिम एकतेची रुजवण अमर शेखांवर तिथेच झाली, अमर शेख हे बार्शीतील गिरणी कामगारांचे कार्यकर्ते होते पुढे कम्युनिस्ट पक्षात सक्रिय होत शेतकऱ्यांचे मोठे लढे उभा केले, गर्जा क्रांतीचा जयजयकार या घोषणांनी इंग्रजांनी अटक केल्यानंतर संपूर्ण बार्शी त्यांनी जागविली, सिनेमा मध्ये रस नवाटल्याने पुढे ते मुंबई कम्युनिस्ट पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ते झाले, संयुक्त महाराष्ट्राचा लढा दिल्ली पर्यंत नेऊन पोहोचविला यावेळी अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, प्र.के.अत्रे या मित्रांनी साथ दिली, अभिजात मराठीच्या दर्जाच्या पायाचे दगड हे 106 हुतात्म्यांच्या रक्ताने रंगले आहेत, तो काळ कष्टकरी वर्गाने बहरवला होतो, कष्टकरी वर्गाला जागविणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे, महाराष्ट्रातील कामगार शेतकरी यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, शिक्षणाचा बाजार, जातीय ध्रुवीकरण, मुलींवरील बलात्कार या प्रश्नांवर अमर शेखांच्या विचारांनी संविधानाने दिलेल्या मतदानाचा अधिकाराचा वापर करून हल्ला करण्याची वेळ आहे.”

सभेचे अध्यक्ष ए.बी. कुलकर्णी म्हणाले “जनतेचे प्रश्न तीव्र झाले आहेत या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी अमर शेखांच्या विचारांची आवश्यक आहे, आयटक व कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते ते काम पुढे नेहतील.”

यावेळी टीडीएफ माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सचिन झाडबुके यांचा सत्कार प्रा. डॉ. महादेव ढगे यांच्या हस्ते करण्यात आला, प्रास्ताविक कॉ. शौकत शेख, सुत्रसंचलन कॉ. प्रविण मस्तुद यांनी केले. यावेळी सतीश गायकवाड, प्रा. डॉ. रविकांत शिंदे, प्रा. प्रेमसागर राऊत, भारत भोसले, आनंद गुरव, अनिरुद्ध नखाते आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या