बार्शी बसस्थानकात चोरी करणारी टोळी बार्शी शहर पोलिसांच्या ताब्यात

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : दि. 17 रोजी दुपारी 04ः00 वा. ते 05ः00 वा.चे दरम्यान फिर्यादी संजय गोपीनाथ पुठठेवाड रा. बार्शी जि. सोलापुर हे त्यांचे मुलाचे पायाचे उपचारासाठी बार्शी मध्ये आले होते. उपचार करून ते बार्शी सोलापुर जाणारे बस मध्ये चढत असताना फिर्यादीचे पॅन्टचे पाठीमागील खिशात ठेवलेले पाकीट त्यात रोख रक्कम 7000/- रूपये कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरल्याची फिर्याद दिल्याने ती बार्शी शहर पोलीस ठाणेस गु.र.नं. 881/2024 भा.न्या.सं.कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयातील फिर्यादीस पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुजीर यांनी संषयीत आरोपीचे वर्णन विचारून घेतले व त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास तपास करण्याच्या सुचना दिल्या.त्याप्रमाणे संशयत आरोपीचा शोध हा बस स्थानक, तुळजापुर रोड,कुर्डवाडी रोड परिसरात शोध घेत असताना पोकाॅ/ प्रल्हाद अकुलवार यांना मिळलेल्या गोपनीय माहिती आधारे सदरचे आरोपी हे बार्शी बस स्थानक परिसरातच फिरत आहेत.

त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथक बस स्थानक परिसरात गेले. तीन संशयत इसम हे बस मध्ये चढत असणाऱ्या लोकांची संषयीत रित्या टेहाळणी करताना आढळुन आले. गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्यांना ताब्यात घेतले व त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता १) जमीर उर्फ शौकत जब्बार शेख वय ३० वर्ष रा. तेलगांव चैक बीड ता. जि बीड,२) उसद जमीर शेख वय १८ वर्ष रा. बलभिम चैक खंदक बीड ता.जि बीड,३) हरून शब्बीर बागवान वय २८ वर्ष रा. शाहु नगर बीड ता. जि. बीड असे असल्याचे सांगितले. सदर आरोपींकडुन चोरीस गेलेली रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे.त्यांना सदर गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. यातील टोळीप्रमुख जमीर उर्फ शौकत जब्बार शेख हा सराईत गुन्हेगार असुन यांने अनेक जिल्हात चोरी केलेली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, अतुल कुलकर्णी सो अपर पोलीस अधिक्षक प्रीतम यावलकर सो उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल साो यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक, बालाजी कुकडे, सहा.पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव, सहा. पोलीस निरीक्षक समीर ढोरे, पोलीस उपनिरीक्षक महेष गळगटे, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुजीर, सहा. पोलीस उपनिरीक्षक अजित वरपे, पोलीस हवालदार अमोल माने, श्रीमंत खराडे,बाळासाहेब घाडगे,बाळकृश्ण डबडे, पोलीस नाईक संगाप्पा मुळे, पोलीस षिपाई प्रल्हाद अकुलवार,अंकुष जाधव,सचिन नितनात, सचिन देषमुख,अविनाष पवार, धनराज फत्तेपुरे, राहुल उदार,गणेष अंकुषराव सायबर शाखेचे रतन जाधव यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या