बार्शीत सोयाबीन,उडीद व मूग खरेदी केंद्राचा शुभारंभ

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : शेतकऱ्यांच्या सोयाबीन,उडीद,मूग या शेतीमालाला योग्य दर मिळावा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाराष्ट्र राज्यातील पहिल्या खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी जि. प. सदस्य संतोष निंबाळकर, केशव घोगरे,कुंडलिकराव गायकवाड, बाजार समिती सचिव जगदाळे,मर्चंट असो.अध्यक्ष बाबासाहेब कथले,दिलीप गांधी, तुळजाभवानी कृषी व साधन पुरवठा सह. संस्था मर्या. उंबरगे संस्थेचे वालचंद मुंढे ,राहुल मुंढे व मार्केटिंग फेडरेशन अधिकारी उपस्थित होते.

बार्शी शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. अखेर खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळणार आहे. NCCF यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मुंबई यांच्या मार्फत तुळजाभवानी कृषी व साधन पुरवठा सह.संस्था मर्या.उंबरगे या संस्थे अंतर्गत धनश्री कृषी केंद्र,प्लॉट नं. १३६,मार्केट यार्ड,बार्शी येथे हे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन, उडीद,मूग हा शेतीमाल या केंद्रावर विक्री करता येणार आहे.

यंदा पावसामुळे खरीप पीकांची काढणी लांबणीवर पडलेली होती. शिवाय बाजार भावापेक्षा हमीभावाचा दर हा कमी असल्याने खरेदी केंद्र ही सुरु करण्यात आलेली नव्हती. पण आता खरीपातील पिकांची काढणी कामे झालेली आहेत. त्यामुळे आवक वाढत आहे. शेतकऱ्यांची गरज ओळखून हे खरेदी केंद्र सुरु करण्यात आल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

  • लागणारी कागदपञे

शेतकऱ्यांनी सोयाबीन,उडीद,मूग खरेदी केंद्रावर आणताना
१) पिक नोंदणी असलेला ७/१२,
२)आधारकार्डशी संलग्न असणारे बँक पासबुक झेरॉक्स
३)आधारकार्ड झेरॉक्स
४)कार्यरत असलेला मोबाईल नं.
५) तलाठी पीकपेरा(ई पीकपाहणी २०२४) इत्यादी कागदपत्रे जमा करावी.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या