बार्शी तालुका पोलिसांनी गहाळ झालेली 13 मोबाईल तक्रारदारांना केली परत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सन 2024 मध्ये हरवलेले मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रारी दाखल होत्या सदर गहाळ झालेल्या मोबाईलचा सायबर पोलीस ठाणे यांचे मदतीने तांत्रिक विश्लेषण करून शोध घेतला असता गहाळ झालेल्या मोबाईल पैकी एकूण 13 मोबाईल किंमत 2.25.982 रुपये किमतीचे मोबाईल मिळून आल्याने सदरचे मोबाईल तक्रारदार यांना बार्शी तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एम .एन .जगदाळे यांच्या हस्ते परत करण्यात आले.

सदरची कामगिरी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर साहेब उपविभागीय अधिकारी बार्शी उप विभागाचे उपविभागीय .पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल उंदरे लोंढे व सायबर पोलीस ठाण्याचे रतन जाधव यांनी केली.

सदर कारवाईमुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले यापुढे ज्या मोबाईल धारकाचा मोबाईल गहाळ झाल्यास हरवल्यास त्यांनी तात्काळ बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे मोबाईलचे संपूर्ण कागदपत्रासह रीतसर तक्रार नोंद करावी असे आवाहन बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन. जगदाळे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या