राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

धाराशिव : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागांमार्फत “राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ” आज ३ मार्च २०२४ रोजी जिल्हयात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साह करण्यात आला. या मोहिमेत ते ५ वर्षे वयोगटातील मुलामुलींना या लसीची मात्रा सर्वत्र दिली गेली. मागील १३ वर्षापासून भारतात एकही पोलिओचा रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे मार्च २०१४ मध्ये भारतातून पोलिओचे समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमाणपत्र राष्ट्रीय स्तरावर प्राप्त आहे.पोलिओ या आजाराचे भारतातून समूळ उच्चाटन करण्यासाठी देशात ही मोहिम दरवर्षी राबविली जाते. काल २ मार्च २०२४ रोजी विटभट्टी,ऊसतोड कामगार,पाल ठोकून राहिलेले नागरीक तसेच वाड्यावस्त्या तांडयावर जाऊन ते ५ वर्षाच्या आतील लाभार्थ्यांना पल्स पोलिओ लसीकरणाची मात्रा देण्यात आली.
जिल्हयात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतर्गत आज ३ मार्च रोजी राबविण्यात आली. यासाठी जिल्हयात ग्रामीण भागात १ हजार २१८ व शहरी भागात १२३ असे एकूण १ हजार ३४१ लसीकरण केंद्राची स्थापना करण्यात आले. जिल्हयात ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र, १ स्त्री रुग्णालय,१ जिल्हा रुग्णालय, १ शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व १ शासकिय आयुर्वेद महाविद्यालय कार्यान्वीत आहे.या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ते ५ वर्षाच्या आतील अपेक्षित १ लक्ष ६९ हजार ८७० बालकांना त्यांच्या पूर्वीच्या लसीकरण स्थितीचा विचार न करता (नविन जन्म झालेल्या किंवा बाळ आजारी असेल तर वैद्यकिय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार) पोलिओ लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

जिल्हयातील १ लक्ष ६९ हजार ८७० ग्रामीण भागातील १ लक्ष ४२ हजार १०७ आणि शहरी २७ हजार ७६३ अपेक्षित लाभार्थी संख्या असून जिल्हयात एकूण ८ तालुके आहेत.जिल्हयातील वाड्यावस्त्या, तांडे,येथील ते ५ वर्षे वयोगटातील मुलां-मुलींना पल्स पोलिओ लसीकरणाची मात्रा देण्यात आली. तसेच आज ०३ मार्च २०२४ रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग रोड, धाराशिव UPHC-१ येथे जिल्हास्तरीय पल्स पोलिओ मोहिमेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या हस्ते फीत कापून तसेच ते ५ वर्षाच्या आतील बालकांना पल्स पोलिओ लसीची मात्रा देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, राज्य नोडल अधिकारी डॉ. पुष्कर देशमुख, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी,जिल्हा आयुष अधिकारी डॉ.गजानन परळीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक होळे,वैद्यकिय अधिकारी खान, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका राठोड, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक तानाजी क्षीरसागर तसेच जिल्हास्तरीय अधिकारी व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या