किरण गुरुबा वाघमारे यांना जिल्हा परिषद सोलापूर मार्फत देण्यात येणारा ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत यावली चे ग्रामसेवक किरण वाघमारे यांना 2021-22 चा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच सन 2022-23 चा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार श्री. रामेश्वर भोसले यांना प्राप्त झाला असून ग्रामसेवकांच्या आयुष्यातील हा मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. पंढरपूर येथे पार पडलेल्या ‘आदर्श ग्रामसेवक ‘ पुरस्कार वितरण सोहळ्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. सुभाष देशमुख, आ. समाधान आवताडे, जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) इशाधीन शेळकंदे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले आदींच्या उपस्थिती मध्ये हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष गोपाळ सुरवसे,सर्व मित्र परिवार, कुटुंबातील सदस्य तसेच ग्रामपंचायत यावली आणि इर्लेवाडी चे सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. किरण वाघमारे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.