सोलापूर चे पोलीस उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांच्यावर लाच मागणीचा गून्हा दाखल

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : येथे दोन लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1 लाख रुपये स्वीकारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सोलापूर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक विक्रम रजपूत याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अँटी करप्शन विभागाकडून सुरु आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उप निरीक्षक विक्रम रजपुत यांनी तक्रारदार यांच्या मित्र यांचेवर एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्हयाचा तपास करत होते.सदर गुन्हयामध्ये मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या मित्र यांचेवर यापूर्वीही अॅट्रोसिटी व इतर गुन्हे दाखल असून त्यांचेवर सीआरपीसी कलम 107 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी पोलीस उप निरीक्षक रजपुत यांनी तक्रारदार यांच्याकडून 2 लाख रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी पडताळणी केली असता, पोलीस उप निरीक्षक विक्रम रजपुत यांनी तक्रारदार यांच्याकडून 2 लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे व तक्रारदार यांच्याशी तडजोडी करून 1 लाख रुपये लाच स्विकारण्यास तयार असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक विक्रम रजपुत यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम 7 व 7(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे.

यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणा-या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक 1064 किंवा दुरध्वनी क्रमांक 0217 -2312668 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रकरणाची पुढील कार्यवाही काय होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.पोलीस उप निरीक्षक श्री. विक्रम रजपुत यांना लाच मागणीच्या आरोपाखाली दोषी ठरवले गेले तर त्यांना कठोर शिक्षा होऊ शकते.या प्रकरणामुळे सोलापूर पोलिस विभागाची प्रतिमा खराब होऊ शकते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या