धाराशिवमहाराष्ट्र

चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत मालमत्ता मुळ मालकांस परत

B1न्यूज मराठी नेटवर्क

धाराशिव : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावून चोरीस गेलेला माल पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकां मार्फत जप्त केला जातो व मुळ मालकांना- फिर्यादींना स्वाधीन केला जातो. गेल्या एक वर्षापासुन धाराशिव जिल्हा पोलिसांनी वाशी पो.ठा.च्या 1, उस्मानाबाद ग्रामीण 1, कळंब 3, तुळजापूर 3, नळदुर्ग 1, तामलवाडी 1, बेंबळी 1,आनंदनगर 2, लोहारा 1, मुरुम 1 अशा 19 गुन्ह्यातील जप्त केलेल्या 17 मोटारसायकल, 02 ट्रॅक्टर, 02 मोबाईल फोन, व 45.89 ग्रॅम सुवर्ण दागिणे असा एकुण 23,99,889 ₹ किंमतीचा मुद्देमाल हा आज दि.01.12.2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृह येथे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मुळ मालकांना- फिर्यादींना परत करण्यात आला. आपले चोरीला गेलेला मौल्यवान एैवज- मुद्देमाल परत मिळवून दिल्याबद्दल या प्रसंगी मालमत्ता धारकांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले. अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन, पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि शैलेश पवार,. कासार, पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच मुळ मालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button