रास्त भाव दुकान परवान्यांसाठी १ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे शहर अंतर्गत पुणे व पिंपरी -चिंचवड महानगरामधील परिमंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात २५ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करण्यास १ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
परिमंडळ अधिकारी ब, क, फ, ग, ह, ल, म यांच्या कार्यक्षेत्रातील २५ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाना मंजूरीचा जाहीरनामा १ जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यातील काही भागातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती लक्षात घेता नवीन शिधावाटप, रास्त भाव दुकान मंजुरीसाठीच्या सहामाही कालबद्ध कार्यक्रमास शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र संस्थांनी १ सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे अन्नधान्य वितरण अधिकारी सिमा होळकर यांनी कळविले आहे.