मुंबईयोजना

ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विशेष साहाय्य योजनेतील श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना उत्पन्न दाखला 5 वर्षांनी देण्यास मान्यता

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : राज्यातील विशेष सहाय्य योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्याची तरतूद आहे सदर योजनेतील 50 वर्षावरील लाभार्थ्यांच्या अडीअडचणी विचारात घेऊन उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.


याबाबत आज संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील 50 वर्ष व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेता तो पाच वर्षातून एकदा घेण्यास शासन निर्णय महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार जारी करण्यात आला यामुळे वृद्धांचे आपले सरकार व महा-ई-सेवा केंद्र व तहसील कार्यालयात वारंवार जाण्याचा त्रास वाचणार असल्याची माहिती नायब तहसीलदार काझी यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button