सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड विकास जाधव यांचा जिल्हा परिषदेत सत्कार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये संपन्न झाली यावेळी सरपंच परिषदेच्या माध्यमातून 22 मे रोजी पासून सुरू होणाऱ्या आंदोलन संदर्भात नियोजन झाले सोलापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त पदाधिकारी व शेतकरी सदर आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड विकास जाधव यांनी केले. दरम्यान सरपंच परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने विकास जाधव यांचा सत्कार करण्यात आला सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील,जिल्हा समन्वयक पंडित ढवण,धामणगावचे सरपंच शिवाजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सरपंच परिषदेच्या जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन नवीन सरपंचांना सरपंच परिषदेत समाविष्ट करून घ्यावे व प्रत्येक तालुक्यात संघटना मजबूत करावी असे यावेळी सांगितले.

महिला जिल्हाध्यक्ष कविताताई घोडके पाटील यांनीही आपल्या मनोगतात सोलापूर जिल्ह्यातून सातत्याने सरपंचांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कार्यरत आहोत यापुढेही महिला सरपंचांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अधिक काम करण्याची गरज आहे तसेच महिलांनीही सरपंच परिषदेमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत राहण्यासाठी पुढाकार घ्यावा अशीही यावेळी आपल्या मनोगत सांगितले.

यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांच्या समस्या बाबत सरपंच परिषदेचे पदाधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी समक्ष भेट घेऊन अनेक विषयावर चर्चा केली सरपंचांच्या समस्या बाबत गांभीर्याने विचार करण्याचे व तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत प्रयत्नशील राहू असेही यावेळी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे आश्वासन दिले.

यावेळी सरपंच परिषदेचे करमाळा तालुका अध्यक्ष अमोल दुरंदे, शिवानंद बंडे, कृष्णा काशीद, अकोलेकाटी सरपंच अंजली क्षिरसागर,ओकांर केंगार, गिंताजली खळसोडे, यांचे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या