सन्मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी घरेलू कामगारांनी माहिती अद्यावत करावी सहाय्यक कामगार आयुक्त यांचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या सन्मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी घरेलू कामगारांनी 31 मे 2023 पुर्वी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात समक्ष हजर राहून अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्तांनी केले आहे.

शासनाकडून 55 ते 60 वयोमर्यादा पुर्ण केलेल्या तसेच घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये 31 डिसेंबर 2022 अखेर नोंदीत असलेल्या घरेलु कामगारांना सन्मानधन योजने अंतर्गत 10,000/- रुपये मिळणार आहेत. यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त, सोलापूर कामगार कल्याण भवन, दमाणी नगर- ४१३००३. या कार्यालयात समक्ष हजर राहून अर्ज सादर करावा.

अर्जासोबत प्रपत्र ‘अ’, बँक पासबुक छायांकित प्रत, लाभार्थ्यांच्या 31 डिसेंबर 2022 पर्यंतच्या नोंदणीची किंवा नुतणीकरणाच्या पावतीची छायांकित प्रत, आधारकार्डची छायांकित प्रत सादर करावी असे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या