सेतू कार्यालय तत्काळ सूरु करा, आमदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सोलापूर येथील सेतू कार्यालय 1 एप्रिल 2023 पासून अचानक बंद करण्यात आले आहे. यामुळे शहरातील बहुसंख्य विद्यार्थी व नागरीकांना शैक्षणिक व इतर बाबींसाठी लागणारे उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला इ. दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालय सुरू ठेवणे आवश्यक आहे. हे कार्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थी व नागरीक यांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तसेच सेतू कार्यालय सोडून इतर सुविधा केंद्रांमधून दाखले काढण्यासाठी अधिकचे पैसे घेण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहे.

सातारा, सांगली,पुणे या ठिकाणी सेतू कार्यालय सूरू आहेत. परंतू सोलापूरातच सेतू कार्यालय बंद करण्यात मागे नेमका काय उद्देश आहे हे समजून येत नाही. सेतू कार्यालय बंद करण्याबाबत शासनाच्या वतीने कोणतेही आदेश दिले नसल्याचे समजते. सोलापूर सेतू कार्यालय टेंडर दि. 31 मार्च 2023 रोजी संपत होते त्या आधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जुन्या कंत्राटदारास मुदतवाढ देणे अथवा नवीन टेंडर काढणे गरजेचे आहे. परंतु तसे झालेले नाही. सेतू कार्यालय सुरु करण्यासाठी विद्यार्थी व नागरीकांनी मला संपर्क साधून त्यांची व्यथा मांडली आहे. व इतर सुविधा केंद्रांमधून कशाप्रकारे अधिकचे पैसे घेतले जातात ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये पसरलेली संभ्रम अवस्था व त्यांची होणारी पैशांची लूट लक्षात घेऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर येथील सेतू कार्यालय तत्काळ सूरू करण्याची मागणी जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या