कांदा अनुदानातील जाचक अट रद्द करावी, बार्शी तहसीलदारांना निवेदन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील युवासेना पदाधिकारी यांनी नुकतेच अर्थासंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला आहे. अस्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 350 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे 200 क्विंटल पर्यंत अनुदान जाहीर केलं आहे. सोबतच राज्य सरकारने काही अटी शर्ती घालून दिल्या आहेत. त्यातील 7/12 उताऱ्यावर पिकपेरा नोंद आवश्यक आहे. अशी जाचक अट घालण्यात आली आहे.
सदर अट हि जाचक असून ति तात्काळ रद्द करण्यात यावी या मागणीचे निवेदन बार्शी तहसीलदार यांच्या प्रतिनिधी कडे देण्यात आले. पुढील काळात हि अट रद्द न झाल्यास युवासेना उग्र आंदोलन करेल. यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख हेमंत रामगुडे, युवासेना विधानसभा प्रमुख अजिंक्य बारंगुळे, युवासेना शहर प्रमुख सचिन चव्हाण, विध्यार्थी सेना तालुका प्रमुख पांडुरंग घोलप, विकास बारबोले ग्रामपंचायत सदस्य शेळगांव मा यांच्या सह युवासैनिक उपस्थित होते.