विविध कार्यक्रमांनी महिला दिन उत्साहात साजरा
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत ॲक्टिव्ह युथ सेल्फ-हेल्प ग्रुप बार्शी च्या वतीने विविध उपक्रम उत्साहात पार पडले महिला दिनानिमित्त प्रामुख्याने महिलांचा गौरव झाला. महिलांसाठी व्याख्यानमाला तसेच होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. सोनाली मसुते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्त्री रोग तज्ञ डॉ.सौ. गौरी गायकवाड व परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष सौ. स्मिता देशपांडे उपस्थित होत्या याप्रसंगी डॉ.सौ. गौरी गायकवाड यांनी महिला/सण/आरोग्य व आनंद याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. व सौ. स्मिता देशपांडे यांनी महिलांना मोबाईल व टीव्हीच्या व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देत व्यसनाधीनता व व्यसनमुक्ती याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर दोन तास रंगलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमात सौ. सुहासिनी पंपट यांनी पैठणीचा मान मिळवला तर द्वितीय क्रमांक डीनर सेटच्या मानकरी सौ. सोनाली मसुते तसेच तृतीय क्रमांक सोन्याची नथचे मानकरी सौ. प्रांजल बिडकर ठरल्या तसेच विविध खेळात सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. होम मिनिस्टर व पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा दळवी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ. श्रीदेवी शीलवंत यांनी तर आभार सौ. मंगल पंपट यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय मसुते सर व सर्व पदाधिकारी व सभासद यांचे सहकार्य लाभले.