बार्शी नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन व राष्ट्रमाता जिजाऊ नगर नामकरण सोहळा संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी -प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील धस पिंपळगाव रोड येथे बांधण्यात येणाऱ्या १५९६ गृह प्रकल्पाचे भूमिपूजन,कार्यालयाचा उद्घाटन समारंभ,वृक्षारोपणाचा कार्यक्रम व राष्ट्रमाता जिजाऊ नगर असा नामकरण सोहळा ह.भ.प.जयवंत बोधले महाराज व आ राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते पार पडला.प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळाला हवा असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.कार्यक्रमाला बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण,बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे मालक,ज्येष्ठ नेते बाबासाहेब मोरे,माजी नगराध्यक्ष रमेश पाटील,नगर अभियंता अजय होनखांबे,तोसिफ शेख,बार्शी नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.