आठ वर्षात भाजपच्या खासदारांनी साधे एक पाण्याची पाईपलाइन सुद्धा आणु शकले नाही : प्रणिती शिंदे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

युवा नेते नासीर बंगाली यांनी जूना प्रभाग क्रमांक १७ येथे हात से हात जोडो अभियाना पूर्वतयारी बैठक घेतली.

सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जूना प्रभाग क्रमांक 20 मध्ये होणाऱ्या “हात से हात जोडो” अभियानाच्या पूर्वतयारीसाठी संयोजक युवा नेते नासीर बंगाली यांनी शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शास्त्री नगर इराबत्ती कैंटीन येथे महत्वाची बैठक आयोजित केली होती.यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशात जातिपातीचे राजकारण सुरु आहे. ते लोकहिताचे कुठलेही काम केले नाही, महागाई प्रचंड वाढली, गैस पेट्रोल, डिझेल प्रत्येक वस्तुचे दर वाढले, अर्थव्यवस्था संकटात आली, बेरोजगारी वाढली. आपल्या उद्योगपती मित्रांचे कर्ज माफ करत आहेत. देशातील सर्व पैसा अदानी ला श्रीमंत करण्यासाठी वपरत आहेत. सर्व सरकारी कंपन्या अदानी ला दिले आहेत. हिंडेनबर्ग रिपोर्ट मुळे अदानी चा फुगा फुटला जनतेचा लाखो कोटी रुपये बुड़ाले. पण मोदी सरकार यावर चकार शब्द बोलत नाहीत. जातिपातीच्या राजकारणात निवडून आलेले सोलापुरचे खासदार आजपर्यंत संसदेत कोणतेही प्रश्न मांडले नाही. साधे एक पाण्याची पाईपलाईन सुद्धा आणु शकले नाही. NTPC च्या माध्यमातून दुहेरी पाईपलाईन सुद्धा शिंदे साहेबांनी मंजूर करून आणली ते ही काम आजपर्यंत सुरु करू शकले नाही. काँग्रेस पक्षाने नेहमीच गोरगरीबांसाठी काम केले आहे. कोणतेही अड़चन असू दया मी तुमच्या सोबत आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नासीर बंगाली यांनी हात से हात जोडो चा अतिशय चांगला कार्यक्रम घेतला यामुळे जनतेत जागृती निर्माण होईल.या कार्यक्रमास आ. प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, संयोजक नासीर बंगाली, मा. नगरसेवक हाजी तौफीक हत्तुरे, जुबेर कुरेशी, अंबादास बाबा करगुळे, शोहेब महागामी, नजीर नदाफ, वाहिद नदाफ, वाहिद बिजापुरे, रफीक चकोले, नासीर पठाण, दाऊद नदाफ, जावेद कुरेशी, सादिक कुरेशी, तिरुपती परकीपंडला, प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, नसरो इनामदार, असलम शेख, इलियास शेख, रजाक कादरी, गौस नदाफ, तौसीफ काझी, सन्नी देवकते, संजय गायकवाड, बाबूभाई इमरान आप्पा, साहिल रामपुरे, लतीफ शेख, दिनेश डोंगरे, महेंद्र शिंदे, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या