आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नांना यश : तालुक्यातील रस्ते कामासाठी 16 कोटींचा निधी मंजूर…
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील माढा-वैराग-उस्मानाबाद रोड(५ कोटी), बार्शी-मालवंडी-मानेगाव-नरखेड रोड(३ कोटी), बार्शी-आगळगाव-काटेगाव-चुंब-कोरेगाव ते जिल्हा हद्द(५ कोटी) काटेगाव-चारे-पाथरी-पांगरी-अंबेजवळगे रोड जिल्हा हद्द(३ कोटी) आदी रस्त्यासाठी १६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या बार्शी तालुक्यातील माढा-वैराग-उस्मानाबाद रोड, बार्शी – मालवंडी-मानेगाव-नरखेड रोड, बार्शी- आगळगाव-काटेगाव-चुंब-कोरेगाव ते जिल्हा हद्द, काटेगाव-चारे-पाथरी-पांगरी-अंबेजवळगे रोड जिल्हा हद्द रस्त्याच्या मजबुती व रुंदीकरणासाठी आवश्यक निधी मंजूर केल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले. या रस्ते कामासाठी निधी मंजूर करण्याकरिता आमदार राजाभाऊ राऊत यांचा सतत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. त्याला मंजुरी मिळाल्याने बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्ते कामास मंजुरी मिळाल्याने दळणवळणासह या भागातील विकासाला चालना मिळेल.