जिजाऊ गुरुकुल मध्ये एक अनोखा उपक्रम

B1न्यूज मराठी नेटवर्क
जिजाऊ गुरुकुल खांडवी मध्ये नऊ देवीचे नऊ अवतार मुलींच्या स्वरूपात अवतरले
बार्शी : आपल्या भारत देशामधील अनेक थोर महान माता, वीर माता जन्मास आल्या त्यांचे कार्य आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे त्यांच्या विचारांचा वारसा आपण चालवित आहोत. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रायमरी गटातील मुलींच्या नऊ देवींचे नऊ रूप वेगवेगळा संदेश देत साकारली यात देवी राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले, रमाबाई आंबेडकर, मदर तेरेसा, सानिया मिर्झा, झाशीची राणी, कल्पना चावला, किरण बेदी, फातिमा शेख या देवी करून समाजातील वास्तविक जाणीव करून त्यांच्या कार्य कर्तृत्वाची माहिती सांगितली.
प्रत्येक वेशभूषेतील या मुलींनी सर्वांचे मन वेधून घेतले, खरोखरच याच देवींची गरज आपणाला सर्वांना आहे, यांच्या थोर विचारांचा ठसा आपण घेत आहोत, असे वक्तव्य संस्थेच्या सचिवा वर्षाताई घाडगे यांनी केले,प्रथमतः मुलींचे पूजन सर्वासमक्ष करण्यात आले.
प्रत्येक वेशभूषेतील या देविनी आपला विचार कथन केला यासाठी प्रशासकीय अधिकारी किशोर कदम, मुख्याध्यापिका राजश्री राऊत,आबोली खर्डेकर, प्रियांका माळी, ऋतुजा बारंगुळे, पल्लवी घायाळ, वैष्णवी जगदाळे यांनी अथक परिश्रम घेतले.