पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांचे दर्शन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे आज पहिल्यांदा सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दुपारी सिद्धेश्वर मंदिरात सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांचे दर्शन घेतले.यावेळी त्यांच्यासमवेत खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, माजी आमदार नरसिंग मेंगजी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी हेमंत निकम आदीसह पदाधिकारी, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.देवस्थानतर्फे पालकमंत्री यांचा सन्मान
सिद्धेश्वर मंदिर देवस्थान पंच कमिटीतर्फे सचिव निळकंठ कोणापुरे, विश्वनाथ लब्बा आणि सुरेश म्हेत्रे यांनी पालकमंत्री श्री विखे-पाटील यांचा सन्मान केला.

बालकांनी केले टाळ्या वाजवून पालकमंत्री यांचे स्वागत


पालकमंत्री श्री विखे-पाटील हे सिद्धेश्वर मंदिरातून सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेऊन निघाले असता मंदिरात सहलीसाठी आलेल्या नूमवि मराठी शाळेच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. पालकमंत्री त्यांच्या स्वागताने भारावून गेले. त्यांनी तिथे थांबून त्यांच्याशी इंग्लिशमधून संवाद साधला. व्हॉट इज युवर स्कूल नेम… तुम्ही कोणत्या शाळेत शिकता…यावर विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव सांगितले. अभ्यास चांगला करा, चांगली शाळा शिका असा सल्ला देवून विद्यार्थ्यांसोबत त्यांनी फोटो काढून घेतला. यावेळी पदाधिकारी, अधिकारी, शाळेच्या शिक्षिका अर्चना जाधव उपस्थित होत्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या