रोटरी क्लब ऑफ बार्शीच्या वतीने राष्ट्र शिल्पकार पुरस्काराचे वितरण

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : आई वडील हे विमानाच्या मागील दोन चाकं व शिक्षक हे विमानाच्या पुढील एक चाक असतं, आकाशात झेपवताना जमिनीपासून वर जाण्यासाठी ही चाकं मदत करत असतात आणि एकदा का पूर्ण झेप घेतली की ती स्वतःला मिटवून घेतात व विमान उंच आकाशाला गवसणी घालतं, अशी असते शिक्षकांची साथ. अशांसारखी अनेक उदाहरणे देऊन प्रमुख वक्ते सचिनजी वायकुळे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
21 सप्टेंबर 2022 बुधवार रोजी रोटरी क्लब ऑफ बार्शीने विनाअनुदानित व सीएसबीवर प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान “राष्ट्र शिल्पकार पुरस्कार” देऊन श्री सोमेश्वर घाणेगांवकर (अध्यक्ष अखिल भारतीय नाट्य परिषद, बार्शी), सचिन वायकुळे (संस्थापक अध्यक्ष स्मार्ट ॲकॅडमी, बार्शी), रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन विजयश्री पाटील, सेक्रेटरी रोटेरियन गोविंद बाफना, प्रकल्प प्रमुख रोटेरियन डॉक्टर सदानंद भिलेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य कोणत्याही शासकीय पुरस्कार यादीमध्ये ज्या शिक्षकांचे नाव येऊ शकत नाही, जे कायमस्वरूपी शिक्षकांसारखे काम करतात किंबहुना जास्त काम करतात, कमी मोबदला मिळूनही मुलांना शिकविताना आपले योग्य योगदान देतात.
अभ्यासू वृत्ती, निस्वार्थ भाव, त्याग व सेवा अशी ज्यांची चतु:सुत्री आहे व आपली सेवा देत अखंड सात ते पंधरा वर्षापासून सेवा देत आहेत. अशा शिक्षकांचा सन्मान रोटरी क्लब ऑफ बार्शीने 2022 या वर्षी केला याचबरोबर जीईई या परीक्षेमध्ये भारतातून प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान या कार्यक्रमांमध्ये केला गेला. अक्षय जाधव, वैष्णवी शरद फुरडे, सम्राट शरद पाटील यांनी उत्तुंग यश या स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवले आहे. प्रथमच अशा शिक्षकांचा सन्मान प्राध्यापक विजयश्री पाटील यांनी आयोजित केला याची सकारात्मक चर्चा सगळीकडे होत असून शिक्षकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख वक्ते सचिनजी वायकुळे यांनी या स्तुत्य उपक्रमाविषयी समाधान व्यक्त करून हा अद्वितीय उपक्रम राबविल्याबद्दल रोटरी क्लबचे “राष्ट्र शिल्पकार पुरस्कार” शिक्षकांचे खूप कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राध्यापक विजयश्री पाटील यांनी विनाअनुदानित सेवा देणारे शिक्षक यांची समाजातील आज असलेली परिस्थिती मांडून हा पुरस्कार देण्यामागील रोटरी क्लब ची भूमिका नेमकी काय आहे? हे व्यक्त केले. डॉक्टर सदानंद भिलेगांवकर यांनी रोटरी क्लब व बार्शीचे कार्य व आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणारे उपक्रम याविषयी शिक्षकांना सविस्तर माहिती दिली. याचबरोबर रोटेरियन सुहास शामराज यांनी मोफत शिक्षक कार्यशाळेमध्ये तालुक्यातील सर्व शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
श्री.सोमेश्वर घाणेगावकर सर यांनी शिक्षक म्हणून सेवा देताना स्वतःचा अनुभव विषयद करत आज समाजामध्ये जितकी आईची भूमिका महत्त्वाची तितकीच शिक्षकांची ही भूमिका महत्त्वाची आहे हे अनेक उदाहरणांना सहीत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह. भ. प. भारती अडसूळ यांनी केले असून आभार प्रदर्शन रोटेरीयन गोविंद बाफना यांनी केले. तालुक्यातील “राष्ट्र शिल्पकार पुरस्कार” विजेते डॉक्टर मार्कड सुभाष सुखदेव (कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी), श्रीयुत कापसे धोंडीराम नवनाथ ( यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, बार्शी), डॉक्टर लाजवंती ईश्वरलाल राठोड( शिक्षण शास्त्र महाविद्यालय, बार्शी ),प्राध्यापक मदन बिरमल वाघमोडे (सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बार्शी), स्वप्निल रमेश करंडे( सोजर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बार्शी), श्रीयुत पांडुरंग साहेबराव फफाळ,( कलाशिक्षक, बार्शी) चिन्मय मांडलेकर( सौ.हि.ने.न.शाह कन्या प्रशाला, बार्शी), केदार राहुल शिंदे (नवनाथ वारकरी शिक्षण संस्था, सौंदरे), सौ. सविता रवींद्र बोधले( मेहर किड्स नर्सरी, बार्शी), श्रीमती विद्या विलास बोधले (उद्यान विहार साधना कन्या प्रशाला, बार्शी), विजय केसरे( जिजाऊ विद्यालय, खांडवी) पुरस्कृत शिक्षकांनी आपले मनोगत यावेळी मांडले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री विजय केसरे व डॉक्टर लाजवंती राठोड यांनी समाधान व्यक्त करत हा पुरस्कार आम्हाला पुढील वाटचालीसाठी अत्यंत प्रेरणा व प्रोत्साहन देणार आहे असे मत व्यक्त केले. समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. रोटरी क्लब ऑफ बार्शीचे सदस्य विनयभाई संघवी, शैलेश वखारिया, विक्रमजी सावळे, मधुकरजी डोईफोडे हे या कार्यक्रमास उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या