शिक्षक हा समाजाचा केंद्रबिंदू : प्रा. मिलिंद जोशी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : लायन्स क्लब बार्शी व लायन्स क्लब बार्शी चेतना आयोजित लायन्स शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा शंभूराजे मंगलकार्यालय येथे पार पडला. लायन्स शिक्षक रत्न पुरस्कार सोहळ्याचे उदघाटन प्रमुख पाहुणे प्रा. मिलिंद जोशी, नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे , प्रांतिय मार्केटिंग चेअरमन अक्षय बंडेवार, रिजन चेअरमन बापूसाहेब कदम, झोन चेअरमन गणेश भंडारी, अध्यक्ष संदीप नागणे, लायन्स क्लब बार्शी चेतनाचे अध्यक्ष गायत्री बंडेवार, सचिव उमेश काळे यांच्या उपस्थितीत पार पडले.शिक्षक आहे समाजाचा केंद्रबिंदू असून पुढील पिढी घडवण्याचं काम करीत असतात…लायन्स क्लब चे काम हे नेहमीच समाज उपयोगी असते आणि ते समजतील शेवटच्या घटकांपर्यंत कसे पोहचता येईल हे बघितले जाते तसचे विद्यार्थ्यांना साठी उपयोगी असणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमा मध्ये न पा शिक्षण मंडळ लायन्स क्लब सोबत असेल…असे बनसोडे साहेब म्हणाले या प्रसंगी रिजन चेअरमन बापू साहेब कदम विद्यार्थी व शिक्षक यांच्या पाठी मागे लायन्स क्लब नेहमीच उभा असेल असे म्हणाले.. झोन चेअरमन गणेश भंडारी यांनी ही आज पर्यंत झालेल्या कामाचे कौतुक केले.
अध्यक्ष संदीप नागणे, तसेच लायन्स क्लब बार्शी चेतनाचे अध्यक्ष गायत्री बंडेवार यांनी आज पर्यंत केलेल्या कामा ची माहिती दिली. या कार्यक्रमास लायन्स क्लब व लायन्स क्लब चेतनाचे सभासद शिक्षक व नागरिक उपस्थित होते.
सभासद सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प प्रमुख शोएब काझी, उमेश काळे, बालकीसन जाजू,ला. राणा देशमुख, भगवंत पोळ,ला गिरीष शेटे, नंदकुमार कल्याणी अल्ताफ शेख यांनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल काळे व आभार प्रदर्शन सचिव उमेश काळे यांनी केले.