लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लिम समाजाची बदनामी करणाऱ्या खा.राणांवर कायदेशीर करवाई करा : उड़ान फाउंडेशन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील उडान फाऊंडेशन या सामाजिक संघटनेने लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लिम समाजाची चालवलेली बदनामी बंद करण्याची मागणी करत खा. नवनीत राणांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलिस निरीक्षक मांजरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.पुढे निवेदनात यामुळे हिंदू – मुस्लिम धर्मामध्ये तेढ निर्माण होत आहे. खासदार नवनीत राणा यांनी पोलिस ठाण्यामध्ये जाऊन हुज्जत घातली याचाही निषेध यावेळी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी केला.
यामध्ये मुस्लिम धर्माला हिनवून टारगेट करण्याचा प्रयत्न खा. नवनीत राणा यांनी करत या प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग देण्याचा प्रयत्न केला. नंतर सदरील मुलीने मी स्वतःहून घरातून निघून गेल्याचे सांगितल्यामुळे खा. राणा या तोंडावर आपटल्या. मात्र आम्ही त्यांचा निषेध करत असून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष इरफान शेख,उपाध्यक्ष इलियास शेख,काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण,सल्लागर युन्नुस् शेख,शब्बीर उस्ताद,मोहसिन पठाण,मुन्ना बागवान,साजन शेख,राजू शिकलकर आदी उपस्थित होते.