रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटार सायकलने घेतला पेट युवकाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील सुलाखे हायस्कूल समोरील रस्त्यावर Hero Passion या गाडीने अचानक पेट घेतला काही क्षणातच ही आग वाढली. त्यावेळी मिलिंद भालेराव हे अमृत काटेगांवकर यांच्या वक्रांगी केंद्र ATM बँक ऑफ इंडिया ग्राहकसेवा केंद्र येथे बँकेच्या कामानिमित्त बसले होते. त्यावेळी त्यांनी ही आग पहिली आणि क्षणाचा ही विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ऑफिसमधील आग विझवण्याचे यंत्र ( Fire Extinguisher Cylinder ) घेऊन ती आग विझवली . विशेष म्हणजे मिलिंद भालेराव यांना त्या यंत्राबद्दल पुरेशी माहिती नसताना देखील त्यांनी हे धाडस केले व तिथे होणारा मोठा अनर्थ टळला.
मिलिंद भालेराव हे बार्शीतील ढगे मळा येथील बँक ऑफ इंडिया मध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत . त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.