राज युवा मंचच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : आगळगाव येथील राज युवा मंच व संभाजी तरुण मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी यंदाच्या वर्षी कोराेना महामारी मधून सावरलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची वर्गणी न मागता स्वखर्चानी श्रीगणेशाच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करून अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले होते.
यावेळी जिल्हा परिषद शाळा मुले – मुली तसेच दिलीपरावजी सोपल आश्रमशाळा आगळगाव येथील सर्व विद्यार्थ्यासह आगळगावातील अबालवृध्दानी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप सरचिटणीस मुकेश डमरे, अमोल नवले, पत्रकार सागर गरड, अमर खराडे, संदिप डमरे, तानाजी जाधव, अक्षय पाटील, गणेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दत्तात्रय नाईकनवरे, भऊ गटकळ, दादा डमरे, समीर शेख, शरद डमरे, भैय्या थिटे, गणेश नाईक, संजय नवले, बिरु कोकाटे,तानाजी जाधव, ज्ञानेश्वर पाटील, केतन डमरे, शैलेश डमरे, संजय नवले, चेतन घाडगे सुदर्शन जगताप, सुहास गरड सह मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

भर पावसातही पर्यायी व्यवस्था करून मंडळाच्या सदस्यांनी महाप्रसादाचे कार्य अविरत सुरू ठेवले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या