कोकणाप्रमाने उर्वरित महाराष्ट्रात आंबा नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी
कोकणेत्तर आंबा बागायतदार संघाची मागणी..
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : कोकणासह सबंध महाराष्ट्रात आंबा बागेचे आंबा मोहोर व फळ गळ होऊन प्रचंड नुकसान झाले असून त्यामुळे आंबा शेतकरी अडचणीत आला आहे. कोकण विभागात आंबा बागेचे पंचनामे करून घेण्याचे काम प्रशासनाने केले असून उर्वरित महाराष्ट्रात पण यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात आंबा गळ होऊन नुकसान झाले आहे त्यामुळे कोकणेत्तर महाराष्टातील आंबा बागेचे नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी कोकणेत्तर आंबा बागायदार संघाच्या वतीने शासनाकडे होत आहे.
यावर्षी विक्रमी मोहोर पण आंबा नाहीच – यावर्षी आंबा झाडांना खूप मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता मात्र सततच्या बदलत्या वातावरणामुळे आंबा मोहोर आणि आंबा फळांची गळ झाली आणि फक्त दहा टक्के च आंबे शिल्लक राहिल्याने चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
कोकणात हापूस तर उर्वरित महाराष्ट्रात केशर आंबा लागवड मोठ्या प्रमाणात – कोकणचा हापूस जसा आंबा प्रेमींना आपल्या चवीने भुरळ घालतो अगदी त्याप्रमाणेच केशर आंबा सुद्धा आता आपली चव ,रंग ,गंध यामुळे आंबा प्रेमिंच्या मनावर राज्य करत आहे. केशर आंब्यासाठी उर्वरित महाराष्ट्रात अनुकूल वातावरण असल्याने केशर लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून आता केशर महाराष्ट्राची ओळख होत आहे.
सामूहिक आंबा संघटन म्हणून कोकाणेत्त्तर आंबा बागायतदार संघ —
कोकणातील हापूस आंबा उत्पादकांच्या संघटना मजबूत असल्याने त्यांच्या विक्री, नुकसान आणि अन्य बाबीसाठी सरकार दरबारी लगेच लक्ष घातले जाते मात्र उर्वरित महाराष्ट्रातील आंबा उत्पादकांच्या मागण्या आणि अडचणी सोडवण्यासाठी आता आंबा बागायतदारांचे कोकणेत्तर आंबा बागायतदार संघ ही संघटना एकत्रित पणे काम करणार आहे.
आंबा फळ प्रक्रिया उद्योगाची गरज — प्रणित देशमुख (कोकणेत्तर आंबा बागायतदार संघ) आंबा देशांतर्गत विक्री बरोबरच आंबा निर्यात ,आंबा प्रक्रिया उद्योगासाठी ठोस काम होणे आता गरजेचे असल्याने शासनाने या उद्योगासाठी पण मदत करावी अशी मागणी संघाच्या वतीने होत आहे.
आंबा क्षेत्र वाढल्याने सामूहिक प्रयत्नांची गरज असून आंबा पिकातील लागवड ते विक्री पर्यंत संघटित पणे काम केल्यास आंबा बागतदाराची फसवणूक कमी होईल – रमेश जाधव (मराठवाडा विभाग प्रमुख , कोकणेत्तर आंबा बागायतदार संघ)





