प्री-मॅट्रीक व पोस्ट मॅस्ट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठीपात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत
B1न्यूज मराठी नेटवर्क
रायगड-अलिबाग,दि.09 : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांनी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता दि.5 मे 2022 रोजीच्या पत्रान्वये सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत भारत सरकारच्या PM-YASASVI (Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India) या एकत्रित शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची राज्यात अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. याकरिता राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रीक व पोस्ट मॅस्ट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ उपलब्ध असून पात्र विद्यार्थ्यांनी NPS (National Scholarship Portal) करिता अर्ज सादर करावेत असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण रायगड-अलिबाग सुनिल जाधव यांनी केले आहे.
प्री-मॅट्रीक शिष्यवृत्ती इयत्ता 9 वी व इयत्ता 10 वी :- लागू प्रवर्ग ओबीसी, व्हीजेएन्टी,डीएनटी, एसबीसी, शाळा शासनमान्य असणे आवश्यक, वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.2 लाख 50 हजार, किमान उपस्थिती 75 टक्के, इतर शिष्यवृत्ती घेता येणार नाही, शिष्यवृत्ती रक्कम रु.4 हजार वार्षिक, दोन मुलांपर्यत लाभ (मुलींसाठी मर्यादा नाही.).
पोस्ट मॅस्ट्रिक शिष्यवृत्ती इयत्ता 11 वी ते पदव्युत्तर/व्यावसायिक अभ्यासक्रम :- लागू प्रवर्ग ओबीसी, व्हीजेएन्टी,डीएनटी, एसबीसी, वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.2 लाख 50 हजार, किमान उपस्थिती 75 टक्के, एफआरए/मान्य प्राधिकरण मान्य अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती, रक्कम डिबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात, अभ्यासक्रम मध्यंतरी सोडल्यास शिष्यवृत्ती रद्द व रक्कम परत करावी लागेल.
अर्ज प्रक्रिया NPS (National Scholarship Portal), विद्यार्थ्यांना https:// scholarship.gov.in, या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक. अर्ज करताना जात प्रमाणपत्र, जातवैधता (लागू असल्यास), उत्पन्न प्रमाणपत्र, आधार लिंक बँक खाते,बोनफाईड प्रमाणपत्र, मागील वर्षाचे गुणपत्रक, Aadhar Authenticated Attendance-75 टक्के ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी, सर्व प्राचार्य, कर्मचारी यांनी शिष्यवृत्तीचे अर्जत तात्काळ व अचूक भरावेत. सर्व शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास सहकार्य करावे, सर्व पात्र विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहू नयेत.




