रोपळे खुर्द शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी वैभव साळुखे यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क
माढा : रोपळे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी वैभव सांळुखे ,उपाध्यक्षपदी विद्या पवार यांची निवड करण्यात आली. ग्रामस्थांनी समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. या वेळी सरपंच सुशील पाटील, माजी सरपंच संताजी पाटील, श्रीकांत काशीद, सुनील कोळी, श्रीकांत पाटील, पप्पा पाटील, सुनील जगताप, तात्या पाटील, शुभांगी गवळी, विद्या पवार, साधना चव्हाण, अहिल्या काळे आदी उपस्थित होते. श्रीकांत काशीद यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा मांडला. शाळेच्या अडचणी व उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.