प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून सुरू असलेल्या वृद्धाश्रमाचे उद्घाटन पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे यांच्या हस्ते संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

प्रार्थना फाऊंडेशन चे कार्य समाजाला दिशा देणारे ठरेल – डॉ रवींद्र कोल्हे

सोलापूर : समाजात आज कित्तेक निराधार आजी आजोबा स्वतःच आयुष्य फुटपाथवर,मंदिर, मस्जिद,रेल्वे स्टेशन,बस स्टँड वर व्यतिथ करत आहे.ज्या वयात त्यांना खऱ्या आधारची गरज असते त्या वयात त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. कित्तेक वयोवृद्ध आजी आजोबांना घरातून हाकलून दिल जातय.वृद्धपकाळात त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षा मागावी लागतेय.कित्तेक निराधार लोक असेच रस्त्याच्या कडेला बेवारस मरण पावतात.ही समाजासाठी निंदनीय बाबा आहे. अशा अनाथ, निराधार, बेघर वयोवृद्धांच्या पुनर्वसन व संगोपनासाठी प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून मोरवंची येथे वृद्धाश्रम सुरू करण्यात आले आहे.त्याचे उद्घाटन पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील तसेच शेतमजूर , अल्पभूधारक, वंचित, निराधार, बेघर, स्थलांतरित, भिक्षा मागणाऱ्या मुलांसाठी प्रार्थना बालग्राम व वंचितांची शाळा हे प्रकल्प चालवले जातात. त्याच बरोबर समाजातील अनाथ,निराधार,बेघर वयोवृद्धांना ही आधार मिळावा त्यांचा वृद्धपकाळात सुखाचा जावा या साठी संस्थेच्या माध्यमातून नव्याने वृद्धाश्रम सुरू केले असल्याचे मत संस्थेच्या सचिव अनु मोहिते यांनी व्यक्त केले.

सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो.आलेल्या कोणत्या ही अडचणीला व संकटाला न घाबरता न डगमगता त्याला धैर्याने समोर गेलं पाहिजे.संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात सुरू असलेल कार्य उल्लेखनीय आहे.भविष्यात प्रार्थना फाऊंडेशन चे कार्य हे समाजाला दिशा देणारे ठरेल असे मत पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे यांनी व्यक्त केले.
वृद्धाश्रामच्या उद्घाटन प्रसंग वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाला मोरवंची गावचे सरपंच प्रकाश वाघमारे, सूर्यभान धोत्रे, अमोल जाधव, गोविंद तिरणगरी,विष्णू भोसले,भाग्योदय इपोळे,मल्लेश तेली आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या