प्रार्थना फाऊंडेशन मधील मुलांची दिवाळी गोड

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : Spaec 79 फाऊंडेशन च्या माध्यमातून 150 मुलांना नवीन कपडे,चप्पल, टॉवेल व फराळाचे वाटप करून मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
दिवाळी सण म्हणजे सर्वांसाठी आनंदाचा सण पण आज ही समाजात कित्तेक मूल या आनंदापासून वंचित राहतात.शेतकरी आत्महत्याग्रस्त,वंचित,निराधार, भिक्षा मागणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद यावा व त्यांना ही दिवाळी साजरी करता यावी या साठी गेली कित्तेक वर्ष प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक कुमार करजगी हे उपस्थित होते.प्रार्थना फाऊंडेशन च काम हे समाजाला दिशा देणार असून त्यांनी हे कार्य सातत्याने करत रहाव आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे मनोगत त्यांनी या वेळी व्यक्त केलं.
दिवाळी ही सर्वांना सुख समृद्धीची जावी,प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा वंचित घटकातील मुलांना ही दिवाळी साजरा करता यावी या साठी प्रार्थना फाऊंडेशन मधील 150 मुलांना नवीन कपडे, चप्पल,टॉवेल व फराळ देऊन त्यांच्या सोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्याचा Space 79 फाऊंडेशन चा हा छोटासा प्रयत्न असल्याचे मत प्रभाकर जमखंडीकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला space 79 फोउंडेशन चे शिरीष दंतकाळे,
अंबादास बासुतकर, दत्तात्रेय बापट (डोम्बिवली) ,मृत्युंजय मड़की, विश्वनाथ लवटे तसेच प्रार्थना फाऊंडेशन च्या सचिव अनु मोहिते,गोविंद तिरनगरी,भाग्योदय इपोळे आदी मान्यवर उपस्थित होते.