
B1न्यूज मराठी नेटवर्क
गौडगाव ता. बार्शी येथील ग्रामपंचायतच्या वतीने गौरी-लक्ष्मी सणानिमित्त माझी महालक्ष्मी स्पर्धा घेण्यात आली होती, या स्पर्धेमध्ये ३५२ महिलांनी सहभाग घेतला होता. माझी महालक्ष्मी स्पर्धेतील विजेता महिलांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानपत्र, रोख स्वरूपात बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. सारिका गटकुल, सरपंच सौ. स्वाती पैकेकर, उपसरपंच उमा शिंदे, वैद्यकीय अधिकारी पूजा थिटे, सदस्य साधना भड, मैनाबाई आरगडे यांच्या उपस्थिती मध्ये, सौ. धनश्री भड यांच्या गौरी-लक्ष्मीस प्रथम क्रमांकाचे बक्षीस ३००० रुपये, सन्मानपत्र तसेच सौ. मनीषा सुतार द्वितीय क्रमांकाचे बक्षीस २००० रुपये, सौ. भाग्यश्री लाटे तृतीय क्रमांक १००० रुपयाचे बक्षीस तसेच उत्तेजनार्थ बक्षीस सौ. मीरा सातपुते, सौ. महाबू शेख यांच्या गौरी-लक्ष्मी ५०० रुपयांचे बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी राहुल भड, गुलाब रोहिले, संजय भड, बालाजी पैकेकर, नागेश काजळे, काकासाहेब भड, मोहन भड, निशा शेळके, सागर सोनवणे, सदानंद दसवंत, श्रीकांत लोहार आदी उपस्थित होते.





