21 किलो 200 ग्रॅम वजनाच्या गांजा सह एक लाख 33 हजार 400 रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त दोन आरोपींपैकी एक आरोपी बार्शीतील

0

B1न्युज मराठी नेटवर्क

बार्शी : 31 रोजी एक इसम व एक महिला होंडा एक्टिवा mh13 डीपी 53 83 असलेल्या टू व्हीलर गांजा घेऊन बी आय टी कॉलेज जवळ विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच , उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक उदार यांचे एक पथक तपास करत असता ताड सौंदणे रोडणे BIT कॉलेज जवळ कॅनल जवळ बातमीप्रमाणे गाडीचा आरटीओ क्रमांक तपासला असता एक इसम व एक महिलांची ,ज्यांची नावे अशी तानाजी दिलीप माने वय ,32 राहणार तुळजा भवानी कारखाना नळदुर्ग, जिल्हा उस्मानाबाद .महिलेचे नाव दुर्गा दीपक हाजगुडे वय 30 राहणार नाळे प्लॉट बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर . त्यांनी टू व्हीलर गाडीवर नायलॉन च्या गोन्या मध्ये 95 हजार चारशे रुपये किमतीचा, 21 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजासह मुद्देमाल जप्त करत बार्शी शहर पोलीस स्टेशन गु. र.न. नंबर 558 / 2021 एनडीपीएस एक्ट 1985 कलम 8 (क) 20 (ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
असून सदर गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यात माननीय कोर्टाने त्यांना तीन दिवसाची कस्टडी दिली आहे .सदर कामगिरी सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव उपविभागीय अधिकारी डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आर. आर. शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. डी. उदार,स. पो. फो.वरपे, माळी ,भोंग,अंमलदार देशमुख कोतवाल पारधी साबळे पोलीस कॉन्स्टेबल मुलांनी घुले यांनी पार पाडली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या