छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल द्या – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे यंत्रणेस निर्देश

B1न्यूज मराठी नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, वीजा, वादळ इ. घटना घडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे तसेच अन्य जीवित वा मालमत्तेच्या नुकसानीचे प्राथमिक पाहणी अहवाल प्राप्त असले तरी यंत्रणेने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी करावी,असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित हे सुद्धा या बैठकीस दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हा मुख्यालयातून अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर हे उपस्थित होते.

मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात ९८ गावे बाधीत झाली असून ५ व्यक्ती मयत तर ५ व्यक्ती जखमी झाले आहेत.६६ जनावरे दगावली आहेत. ६२ पक्क्या घरांची तर ११२ कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे.जिल्ह्यात एकूण १२४६ शेतकऱ्यांचे ६१६.३ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे, अशी माहिती देण्यात आली.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला आहे.विजा कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या नुकसानीची क्षेत्रीय यंत्रणेने प्रत्यक्ष पाहणी करावी. पंचनामे इ. प्रक्रिया करावी व आपला अहवाल पाठवावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button