श्रीरामपूर येथे दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न , मेळाव्यात १०२ उमेदवारांची प्राथमिक तर ६८ उमेदवारांची अंतिम निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क
अहिल्यानगर : जिल्हा कौशल्य विकास विभाग, एमआयडीसी इंडस्ट्रीयालिस्ट असोशिएशन व औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटी श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. जयंतराव ससाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था श्रीरामपूर येथे आयोजित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात १०२ उमेदवारांची प्राथमिक तर ६८ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.
मेळाव्यास आमदार हेमंत ओगले यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनिल शिंदे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी, औद्योगिक विकास महामंडळाचे दिलीप काकडे, प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पालवे आदी यावेळी उपस्थित होते.
मेळाव्यात १४ आस्थापनांनी ४८० पदे अधिसूचित केली होती. मेळाव्यास उपस्थित ४१६ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांनी उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणाच्या संधीबाबत मार्गदर्शनही केले.