मंगळवेढ्यात अवैध वाळू वाहतूकीच्या वाहनाने घेतला पोलिस कर्मचारीचा बळी……. वाळू माफियांची मुजोरी रोखणार का पोलीस प्रशासन? जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष!

B1न्युज मराठी नेटवर्क / प्रतिनिधी दिनेश खंडेलवाल
मंगळवेढा तालुक्यामध्ये अवैद्य वाळू वाहतूक करणारे वाहन व वाळूमाफियांची मुजोरी वाढली असून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोला थांबवण्याचा इशारा करत असतानाच अहमदनगर वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने लोकसेवक पोलीस कॉन्स्टेबल गणेश प्रभू सोनलकर बक्कल नंबर 579 यास धडक देऊन चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सोलापूर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू व्यवसाय बोकाळला असून पोलिस प्रशासनाला याचा फटका बसला आहे.
सध्या तालुका आणि त्यातील गावात खुलेआम वाळू चोरी होताना दिसत आहे. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गोणेवाडी – शिरशी मार्गावर हॅटसन डेअरी जवळ ही घटना घडली असून आज लोक अदालत असल्यामुळे पोलीस कर्मचारी गणेश प्रभू सोनलकर (वय 32) हे समन्स बजावणी साठी गेले होते. गोणेवाडीचे पोलीस पाटील यांना हॅटसन डेअरी येथे येण्यास सांगून गणेश सोनलकर हे वाट पाहत थांबले असताना समोरून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोला त्यांनी हात केला.
वाहनात वाळू असल्याने टेम्पो चालकाने वाहन थांबविण्याऐवजी थेट पोलीस गणेश सोनलकर यांच्या अंगावर घातले. या प्रकाराने त्यांचा जागीच चिरडून मृत्यू झाला. शासनाच्या मालकीच्या वाळूची बेकायदेशीर रीत्या व विनापरवाना चोरी करून वाहतूक करणाऱ्या वाहनावरील चालक व त्याचा साथीदार व त्या वाहनाचा मादक या तिघांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 302, 333, 353, 279, 379, 34 पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9,15 मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा घडला त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम अप्पर पोलीस अधिकारी हिम्मत जाधव मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील मॅडम यांनी भेट देऊन माहिती घेतली यातील आरोपींना लवकरच पकडण्यात येणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.या घटनेनंतर वाळू माफियांची मुजोरी पोलीस प्रशासन रोखणार का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.