जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सूचनागोदावरी खोरे नियामक मंडळाच्या बैठकीत १२ कामांना मान्यता

0

पाटबंधारे विकास महामंडळांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत !

B1न्यूज मराठी नेटवर्क

अहिल्यानगर : पाटबंधारे विकास महामंडळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वयंपूर्ण झाली पाहिजेत, यासाठी महामंडळाने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या नियमाक मंडळाच्या बैठकीत दिल्या.

गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ८४ वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, गवळी यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, महामंडळाकडे स्वतःचे उत्पन्न वाढले तर सिंचन प्रकल्पाची अनेक कामे मार्गी लागतील. या वाढीव उत्पन्नातून उपसा सिंचन योजनांचा देखभाल दुरुस्तीचा खर्च भागवणे शक्य होईल. उत्पन्न वाढीसाठी महामंडळाच्या ताब्यात असलेल्या जमिनीची माहिती संकलित करावी. या जागांची मोजणी करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी याचे सर्व्हेक्षण करावे. हे काम कालबद्ध रीतीने करावे. नियामक मंडळाने मान्यता दिलेली कामांचे सूक्ष्म नियोजन करून ती गतीने पूर्ण करावीत अशा सूचनाही विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच जाहिरात देऊन महामंडळासाठी कायदा सल्लागाराची नेमणूक करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. आज झालेल्या गोदावरी नियामक मंडळाच्या ८४ व्या बैठकीत १२ कामांना मान्यता देण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या